web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात मनमानी कारभार सामान्य जनतेचे आरोग्य वार्‍यावर;आमदार,खासदार,वैधकीय अधिकार्‍यावर नामूष्की पालकमंत्री गप्पच

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

केन्द्र आणि राज्य सरकारने कोरोना कालावधीत जनसामान्याच्या नावाने आरोग्यसेवेवर करोडो रूपये खर्च केले परंन्तु मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर,केसपेपर विभाग ,नर्स कर्मचारी यांची दादागिरी मनमानी चालली आहे.औषधे उपौचाराकडे पुर्णता दुर्लक्ष झाल्याने सामान्य गोरगरीबाना खाजगी रूग्णालयात बोगस डॉक्टरांच्या उपौचाराला बळी पडावे लागत असल्याची नामुष्की स्थानिक आमदार,खासदार, पालकमंत्री,ठाणे जिल्हा वैद्यकीय अधिक्षक यांच्यावर आली आहे.

  मुरबाड ग्रामीण रूग्णालयात केवळ ठेकेदारीने दवाखाण्याची इमारती पत्राशेड मातीवर डांबरीकरण रस्ते एवढीच सोय झाली परन्तु मुरबाड ग्रामीण रूग्णालयात सामान्य रूग्णांना आपुलकीची भाषा वापरून उपौचार करणारे कर्मचारी नाहीत.डॉक्टर नाहीत एक्सरे मशिन बंद आहे औधषे देण्यासाठी सकाळी 11 वाजता खोळणारी खिडकी दुपारी 12 वाजता बंद केली जाते रूग्णांनी डॉक्टर कुठे आहेत विचारले तरी रूग्णांना बाहेर हाकलुन दिले जाते आपमानीत करून दादागिरी केली जाते आमच्या कुठेही तक्रारी करा असा साज आणि माज चढवला जातो. 

      याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करतात स्थानिक आमदार खासदार पालकमंत्री तेथील रूग्णालयात भेट देवुन चौकशी करत नाहीत अशा संतापजनक वातावरणात दिवसातुन फक्त तीन तास सुरू असलेले रूग्णालयाच्या कामकाज विरोधात नागरिकांनी आता तिव्र संताप व्यक्त करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

  दरमहिना आरोग्याच्या सेवेसाठी शासन कोटीरूपये खर्च करतो कोटी रूपायाची औषधे देतो त्याचा फायदा जनसामान्या जनतेला होत नसुन ही औधषे खर्च कुठे जिरवला जातो याची चौकशी आरोग्य मंञ्यानी करून कारवाई  करावी अशी मांगणी विकासमंच ट्रस्टच्या राष्ट्रीय महिलाध्यक्षा तथा पत्रकार ज्योतीताई शेलार यांनी केली असुन येत्या 15 दिवसात मुरबाड ग्रामीण रूग्णालयात सुधारणा झाली नाही चौवीस तास रूग्णांवर उपौचार करण्यात आले नाहीत तर प्रथम वरिष्ठ वैद्यकिय अधिकार्याना बांगडयाचा आहेर पाठवुन उपोषण आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

  मुरबाड ग्रामीण रूग्णालयात झालेल्या बाळाचा मृत्यु डॉक्टरांचा कर्मचार्याचा हालगर्जीपणा कोणता कर्मचारी फार्मशी कोणतं काम करतो कोणते कर्मचारी भरती केली आहे.याची चौकशी शासनाने करून सामान्य जनतेला दिलासा दयावा अशी मांगणी ज्योतीताई  शेलार यांनी केली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

           दिनांक 07/11/2021 रोजी सोमवारी मुरबाड ग्रामीण रूग्णालयात दुपारी 12 वाजता डॉक्टर उपलब्ध नव्हते त्याची रूग्णांनी विचारणा केली असता तेथील टेम्परवरी शुगर बिपी तपासणीक यांनी रूग्णांना हाकलुन लावुन येथे विचाराचे नाही दवाखाण्यातुन निघुन जा दवाखाना बंद झाला आहे असे बोलुन स्वताचा बीपी वाढवला तर शिकावू मुलीने केस पेपर मिळणार नाहीत दवाखाना बंद झाला असे सांगुन रूग्णांना बाहेर काढले असे प्रकार आमच्या समोर घडले आहेत आम्ही महिला हे खपवुन घेणार नाहीत असा इशार शेलार यांनी दिला.

 

No comments