web-ads-yml-728x90

Breaking News

लोकल मध्ये चढताना तोल गेल्याने लोकल ट्रेन खाली जाणाऱ्या दोन महिलांचे आरपीएफ महिला जवान सपना गोलकर यांनी वाचवले प्राण

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कोरोनाचा काळ असो की अन्य कोणतीही नैसर्गिक आपत्ती; या सर्व बाबींचा सामना करण्याबरोबरच रेल्वेच्या संपत्तीची सुरक्षा करण्यासाठी डोळ्यांत तेल घालून अहोरात्र रेल्वे सुरक्ष दलासह लोहमार्ग पोलीस कार्यरत असतात. असे असताना, याच रेल्वे पोलिसांनी अनेक प्रवाशांचे जीव वाचवत त्यांना जीवनदान देण्याचे कार्यदेखील केले आहे. रेल्वे प्रवासी, रेल्वे संपत्तीची करण्यात येणारी नासधूस, हिंसा, रेल्वे प्रवासी संघटनांकडून होणारी आंदोलने, रेल्वे प्रवासादरम्यान हरविलेल्या मुलांचा शोध घेणे, स्टेशन परिसरात अमली पदार्थांचे सेवन व विक्री यांसारख्या विविध सुरक्षेबाबत दक्षता घेण्याबरोबरच आवाहनांचा सामनादेखील त्यांना करावा लागत आहे. 

अशातच स्टैंडहस्तरोड रेल्वे स्थानक येथे दि.२३/१०/२०२१ रोजी घडलेली रेल्वे स्थानकातील घटना लोकल मध्ये चढताना एका ५५ वर्षीय महिलेचा तोल गेल्याने लोकल ट्रेन खाली जाणाऱ्या या महिला प्रवासीचा जीव वाचणान्या धाडशी कॉन्स्टेबल आरपीएफच्या महिला जवान सपना गोतकर तसेच दूसरी घटना दि.२१/११/२०२१ रोजी रात्री आठ वाजता ८.वा भायखळा स्थानकात ऑन ड्यूटी आरपीएफ महिला जवान सपना गोलकर यांनी पुन्हा लोकल मध्ये चढताना एका ४० वर्षीय महिलेचा जीव वाचवला आहे.

युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरुणजी बकोलिया,महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सौ.सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र दगडू सकपाळ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णाताई कदम यांच्या सुचणेनुसार व मुंबई प्रदेश अध्यक्ष  अमोल वंजारे यांच्या अध्यक्षतेने मार्गदर्शनानुसार युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतच्या मुंबई टीमच्यावतीने  आरपीएफ महिला जवान सपना गोलकर व स्टेशन व्यवस्थापक श्री विनायक शेवाळे यांचा गुरुवारी दि. २५/११/२०२१ रोजी शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व संघटनेचे कोरोना योद्धा प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी महाराष्ट्र महिला संघटन मंत्री सौ.सुजाता मंगेश सावंत,मुंबई महिला महासचिव सौ.पूजा दळवी,मुंबई सचिव सौ.वसुधा वाळूज,सचिव घाटकोपर विधानसभा महेश प्रकाश आंबे,घाटकोपर ब्लॉक प्रेसिडेंट प्रकाश तुकाराम आंब्रे,दिनेश पवार सदस्य,सौ.नीता कडलग सदस्य,योगीश माळव, मंगेश जगन्नाथ सावंत, अमोल कसर व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते

No comments