मुरबाड मधील तरुणाची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिक्षण संस्थेत भरारी
BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे
कान्हार्ले गावातील प्राथमिक शिक्षक मंगलदास जयवंत कंटे यांचा मुलगा प्रसन्न मंगलदास कंटे यांची IIT, इंदोर येथे निवड झाली आहे. त्यांनी JEE मध्ये चांगलं यश मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं. मुरबाड तालुक्यातून प्रथमच IIT सारख्या नामांकित शिक्षण संस्थेत स्थान मिळवणारा प्रसन्ना हा पहिला विद्यार्थी ठरला आहे. प्रसन्न यांनी IIT मध्ये मेकॅनिकल इंजिनीरिंग क्षेत्र निवडले आहे. लहानपणापासून अभ्यासाची आवड आणि घरात आई -वडिलांनी निर्माण केलेल्या शिक्षणमय वातावरणामुळे प्रसन्ना यानी यापूर्वी दहावी आणि बारावीमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळविले होते. आई वडील दोन्ही प्राथमिक शिक्षक असल्याने शिक्षण आणि संस्काराची योग्य सांगड घालून आपल्या मुलींना B.A.M.S. आणि इंजिनियरिंग च शिक्षण देऊन प्रसन्ना यांनाही वेळोवेळी मार्गदर्शन केले. उच्च शिक्षित आणि संस्कारी मुलं हीच खरी संपत्ती असते असे प्रसन्ना यांच्या आई-वडिलांचे मत आहे. कंटे कुटुंबीयांनी आणि कान्हार्ले गावाने पूर्वीपासून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. प्रसन्ना यांची भावंडे वैद्यकीय, इंजिनीरिंग,शिक्षण, न्यायालय, कन्स्ट्रक्शन आणि व्यापार क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रसन्ना यांचे आजोबा कै. जयवंत कंटे हे सन 1973/74 साली प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. गावात जुन्या काळातील कै. नारायण कंटे, कै. महादू गवाळे आणि श्री. शंकर गवाळे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. गावात आज मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षक आहेत. व्यापार, शिक्षण आणि राजकारणात गावातील मंडळी सक्रिय आहे. आजही या गावात अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. प्रसन्ना यांनी शिक्षण क्षेत्रात टाकलेलं प्रगतीच पाऊल त्यांच्या घरातील, गावातील आणि पर्यायाने तालुक्यातील नवीन पिढीला आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
No comments