web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध सुविधांच्या निर्मितीसह विकासकामांना गती देणार – पालकमंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातील कामांचा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. सन 2021-22 च्या आराखड्यानुसार उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ही कामे नियोजित वेळेत तसेच दर्जेदार करण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.पालकमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एमएमआरडीएच्या सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, परिवहन मंत्री अनिल परब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments