web-ads-yml-728x90

Breaking News

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शांततेचे आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नोव्हेंबर- त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले आहे.याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. चव्हाण म्हणाले की, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत. निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचे पालन करावे, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

No comments