web-ads-yml-728x90

Breaking News

एक चौथरा,तीन भिंती २२ लाख खर्च ;ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाला चुना लावण्याचा प्रताप....!

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड

वनविभागाच्या एकलक्ष वृक्ष लागवड सामाजिक वनिकरणाची चौकशी ससेमिरा सुरू असून  यात अतंर्गत बंडाळीत तालुक्यातीस वनविभाग पोखरल्याचा फटका थेट जिल्हावनअधिकारी  कोलेकर यांची चौकशी सुरु असतानाच प्रसिद्ध वनहुतात्मा स्मारकाच्या नांवे  तीन भिंती एक चौथरा बनविण्यात येत त्यावर २२ लाखाची उधळण मुरबाड पुर्व वनविभागाने चालवली असल्याने केवल ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाला चुना लावण्याचा प्रताप सुरू आहे.ज्या वनकर्मचा-यांचा कामावर असतांना बळी गेला आहे त्याच्या नांवे ११सप्टेबरला महाराष्ट वनहुतात्मा दिन साजरा केला जातो जिल्हाभरात वनकर्मचारी बळी गेलेल्यात टोकावडे वनविभागातुन बळी गेलेल्या दोन घटना घडल्या होत्या त्यांचे ठाणेवन वृत्ताचे वनहुतात्मा स्मारक ठाणे येथे बांधण्यात येणार होते  परंतु ते स्मारक मुरबाड मुरबाड पुर्व वनविभागाने  ऑगस्ट महिण्यात बांधकाम सुरू केले आहे हे काम शिवशक्ती इटंरप्राईजेस बनवित आहे या वनहुतात्मा स्मारकांसाठी २२लाख रूपये निधी उपलब्ध असून केवळ या रक्कमेतुन एका तीन×सहा सिमेंटच्या चौथ-यां वर सहाफुट उंचीच्या तीन भिंती बांधकामावर २२ लाखाचा खर्च पाहता हे काम करताना याच काम आणी खर्च पाहता  केवळ ठेकेदारी पोसण्यासाठी हा खटाटोप होत असल्याचा आरोप होतो आहे  या बाबत या कामाची जबाबदारी असलेले मुरबाडपुर्व चे वनक्षेत्रपाल विकास भामरे यांनी सांगितले की हे  काम  अद्याप अपुर्ण असुन ह्यात ब-याच  त्रृटी असल्याने ठेकेदारास रक्कम अदा केली जाणार नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

या, कामाचे उदघाटन सुद्धा, वनमंत्री, पालक मंत्री, यांना डावलून केले काय यांचा खुलासा वन अधिकारी यांनी करावा वनाधिकारी ठेकेदारीकडे वळले आहेत याचा फायदा जगलं तोड ठेकेदार घेत आहेत त्याचा पुरावा बेसुमार जगलंतोंड ची झाडें वन विभागानी दिला आहे असे अनेक भष्ठ कारभार समोर येणार आहेत


 

No comments