web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान; उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या ‘गंधार’ कला संस्थेतर्फे  लहान मुलांच्या ‘कट्टी बट्टी’ या कार्यक्रमाचे  तसेच ‘गंधार गौरव’ पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर,  ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की  व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते.

No comments