web-ads-yml-728x90

Breaking News

विशेष पुनरीक्षण मोहीम मतदार नोंदणी अभियानास मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

भारत निवडणूक आयोगाने दि. १ नोव्हेंबर, २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision Programme) जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हयातील 18 वर्षे पूर्ण तरुण-तरुणी, दिव्यांग, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि समाजाच्या वंचित घटकातील व्यक्ती यांची मतदार यादीत नाव नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हयातील १० विधानसभा मतदार संघामध्ये विविध घटकांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यास मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

अंध व्यक्तींची मतदार नोंदणी
या विशेष शिबिरामध्ये १८२-वरळी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात नॅब (National Association for Blinds) या संस्थेतर्फ अंध व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरास राजीव निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई यांनीही उपस्थित राहून शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. सदर शिबीरास मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील अंध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी १२ मतदारांनी नांव नोंदणी केली तर ५ मतदारांनी नाव, पत्ता, फोटो इ. बाबत दुरुस्ती केली तर १ मतदाराने आपले नाव मतदार यादीतून कमी केले. सदर अंध व्यक्तींनी व त्यांच्यासोबत आलेल्या मतदारांनी या शिबीराबाबत समाधान व्यक्त केले.

No comments