web-ads-yml-728x90

Breaking News

सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती,  उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती,  राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती राष्ट्रीय फेलोशिप अशा विविध योजना सुरू आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर  यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती योजना संदर्भात विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.दिव्यांग विदयार्थ्यासाठी प्री मट्रिक शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता 9 वी आणि 10 वी चा समावेश आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न – 2.50 लाख आहे त्या पाल्यांना शिष्यवृतीचे दर  हा  डे स्कॉलरसाठी 500 रुपये दरमहा आणि वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरिता 800 रुपये दरमहा शिष्यवृत्ती आणि पुस्तके अनुदान आणि विकलांग भत्ता ज्याची वार्षिक मर्यादा 2000 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत असु शकते.

दिव्यांग विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी इयता 11 वी पासुन मास्टर डिग्री आणि डीप्लोमा स्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न – 2.50 लाख आहे अशा पाल्यांना त्याचा लाभ घेता येईल.शिष्यवृतीचे दर पुढीलप्रमाणे आहे विविध विषयात डिग्री डिप्लोमा इत्यादीतुन संबंधित स्नातकोत्तर, स्नातक, डिप्लोमा  व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता देखरेख भत्त्याचे दर विविध आहेत. ही वसतिगृहात  राहणाऱ्या  विद्यार्थ्याकरिता 900 -1600 रुपये दरमहा तसेच डे स्कॉलरसाठी 550-750 रूपये दरमहा मर्यादेत ट्युशन शुल्क (अधिक वार्षिक मर्यादा 1.50 लाख रूपये) पुस्तक भत्ता आधिक विकलांग भत्ता ज्याची वार्षिक मर्यादा 2000 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत असु शकते.

No comments