web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रीय सेवा योजना, पडघा महाविद्यालय आणि विवेकानंद प्रतिष्ठान, पडघा यांच्या संयुक्त विद्यमाने "एक पणती सैनिकां साठी"


 BY - युवा महाराष्ट्र लाईव - पडघा,भिवंडी।

आपण रोज आपल्या दैनंदिन जिवनात अनेक कामे करत असतो, वेगवेगळे सण, उत्सव साजरे करतो, सुखःदुख्खाच्या घटनां मधे सहभागी होत असतो एवढचं नाही तर रात्री निवांतपणे झोपत असतो आणि हे सगळं आपल्याला करता यावं, आपला येणारा उद्याचा दिवस चांगला असावा म्हणून स्वतःचा आज देशासाठी देत असतो तो म्हणजे आपला सैनिक, आपला जवान, आपले जवान प्राणपणाने आपल्या देशाच्या सीमांच रक्षण करत असतात, ऊन पाऊस थंडी या कशाचीही पर्वा न करता आपले जवान आपल्या देशाचे शत्रूं पासून रक्षण करत असतात आणि हे करत असताना प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देतात, आपल्या या जवानांना दिर्घायुष्य लाभाव म्हणून दरवर्षी आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना, पडघा महाविद्यालय आणि विवेकानंद प्रतिष्ठान, पडघा यांच्या संयुक्त विद्यमाने *एक पणती सैनिकां साठी* , या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो, यावर्षी मंगळवार दिनांक ०२.११.२०२१ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजता विठ्ठल मंदिर प्रांगण, पडघा या ठिकाणी या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन पडघा पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक मा.श्री. कटके साहेब उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे व्यवस्थापक श्री. जयंत सोनटक्के, पडघा ग्रामपंचायत सदस्य श्री. शैलेश बिडवी, श्री. रविंद्र विशे, शारदा विद्यालय शालेश समिती सदस्य श्री अशोक शेरेकर, समाजसेवक श्री अभिनव पाटील, पडघा पोलीस स्टेशनचे श्री. देसले इ. मान्यवरांसह  महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे  माजी  विद्यार्थ्यी तसेच पडघा आणि परिसरातील नागरीक  उपस्थिती होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री कटके साहेब यांनी आजच्या तरुणांनी सामाजिक जबाबदारी घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक असुन सामाजिक जाणिवा जपणे देखील आवश्यक आहे असे आवाहन केले, याच बरोबर आजच्या तरुणांनी मोबाईल, संगणक इ. चा उपयोग काळजीपूर्वक करावा आणि चांगल्या कामासाठी करावा असा मोलाचा सल्ला देखील दिला. श्री. अशोक शेरेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयाचे  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना ठाणे जिल्हा झोन III जिल्हा समन्वयक प्रा दिपक पोंक्षे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अँड. अजित कराडकर यांनी केले. या नंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी शहिद जवान प्रतिकृती ला फुले अर्पण करुन अभिवादन केले तसेच देशाच्या सिमेवर तैनात असणाऱ्या जवानांच्या सुरक्षितते साठि आणि  दिर्घायुष्या साठी प्रार्थना म्हणून पणती  प्रज्वलित केली.

No comments