web-ads-yml-728x90

Breaking News

भारत व दुबई यांच्यातील नाविन्यता परिसंस्थेसंबंधीत धोरणात्मक संबंध मजबूत होतील – मंत्री नवाब मलिक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी आज दुबई सिलिकॉन ओएसिस (DSO) च्या इंटिग्रेटेड फ्री झोन टेक्नॉलॉजी पार्कला भेट दिली.राज्य शासनाच्या शिष्टमंडळासह मंत्री नवाब मलिक यांनी ‘पिपल हॅप्पीनेस ॲण्ड इनोव्हेशन’चे वरिष्ठ उपाध्यक्ष गनीम अल फलासी यांची भेट घेतली. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी दुबई सिलिकॉन ओएसिस आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस (DTEC) यांचा दौरा केला.या भेटीचा एक भाग म्हणून मंत्री नवाब मलिक आणि गनीम अल फलासी यांनी राज्यातील स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राची नोडल एजन्सी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी [MSInS] आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस यांच्यातील संभाव्य भागीदारीच्या मुद्यांचा अभ्यास केला.दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रिनर कॅम्पस मध्यपूर्वेतील तंत्रज्ञान स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यास कार्यरत आहे आणि सध्या ७५ देशांमधील १,००० हून अधिक स्टार्टअप्सचे केंद्र आहे. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान जसे की ब्लॉकचैन, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादि क्षेत्रांत काम करणाऱ्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. तंत्रज्ञानकेंद्रित स्टार्टअप्स, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रगत सुविधा प्रदान करण्यासाठी दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस बांधील असून याअंतर्गत अत्याधुनिक को-वर्किंग स्पेसेस, एक्सीलेरेटर, व्हीसी फंड, आयडिया व्हॅलिडेशन, सल्लागार सेवा इत्यादी सेवा पुरवण्यात येतात.महाराष्ट्र राज्यात भारतातील सर्वाधिक स्टार्टअप्स नोंदणीकृत असून, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र शसनाच्या नाविन्यतेस पूरक वातावरणामुळे राज्यातून १६ युनिकॉर्नस तयार झालेले आहेत. भागीदारीविषयी बोलताना मंत्री श्री.मलिक म्हणाले की, ” दुबई सिलिकॉन ओएसिस (DSO) आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस (DTEC) या भेटीचा उद्देश भारत व दुबई यांच्यातील नाविन्यता परिसंस्थेसंबंधित धोरणात्मक संबंध मजबूत करणे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जास्तीत जास्त स्टार्टअप्सना मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका (MENA) प्रदेशात विस्तार करण्यास मदत होईल. तसेच कौशल्य विकास विभागाच्या इतर क्षेत्रांसाठी दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस सोबत भागीदारी करण्यात येईल.

 

No comments