web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तालुका प्रिंट मिडीया प्रेस क्लबची बैठक संपन्न झुंझार वृत्तपत्राचे पत्रकार एका छताखाली

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवठाणे

दि 3 11 2021 रोजी मुरबाड तालुका प्रिंट मिडीया प्रेस क्लबच्या माध्यमातुन नियमित तसेच शासन जाहिराती यादीवरील वृत्तपत्राचे पत्रकार एकत्र आले आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या आणि शासन नियमावली मधुन पत्रकारिकाच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाणार असुन स्थानिक पातळीवर नियमावलीतुन काम केले जाणार आहे.प्रिंट मिडीयाच्या प्रेस क्लब मध्ये नियमित सुरू असणारे वृत्तपत्र शासनयादीवरील वृत्तपत्राच्या प्रतिनिधी संपादकाना सदस्य म्हणुन घेतले जाणार असुन इच्छूकानी संपर्क करावा असे अहवान नामदेव शेलार यांनी केले आहे.प्रिंट मिडीयाचे पत्रकार नामदेव शेलार,शाम राऊत ,जयदिप अडाईंगे ,आरूण ठाकरे , मंगल डोंगरे ,गौरव शेलार, अनंता घागस ,मिलिंद दळवी , हे उपस्थित होते तर गोपाळ पवार नंदकुमार मलबारी यांच्यासह अन्य चार पत्रकारानी मुरबाड तालुका प्रिंट मिडीया प्रेस क्लब मध्ये सामील होत असल्याची घोषणा केली. सदर प्रिंट मिडीया प्रेस क्लब कोणत्याही पत्रकार संघाशी सलग्न नाही सर्वानी एकत्र यावे असा उद्देश पत्रकाराचा असुन ज्यांना पत्रकार म्हणुन एकत्र प्रिंट मिडीयाच्या प्रेस क्लब झेंडयाखाली येण्याची इच्छा असेल त्यांनी यावे फक्त वृत्तपत्राचे पत्रकार यानाचं सदस्यत्व मिळेल अनियमित वृत्तपत्राच्या प्रतिनिधीना सदस्यत्व नाही.

No comments