web-ads-yml-728x90

Breaking News

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याला गती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर अद्ययावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली आहे.  आगामी शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदवीची पहिली तुकडी सुरू करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून या विषयावर चर्चा करण्यासाठी मुंबईत गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते.गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात तसेच येथील स्थानिक आदिवासी मुलांना तिथेच वैद्यकीय उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या जागी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांवर उपचार करण्यासाठी अनेकदा त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलवावे लागते. यात बराच वेळ खर्ची पडत असल्याने याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिल्यास अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येतील, अशी त्यामागची त्यांची भूमिका आहे.

No comments