web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान ; महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव नवी दिल्ली

तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख आणि राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज दोन टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि  समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी  कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले.

No comments