web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव अहमदनगर

कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि   विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे तसेच  राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. वीज व पाणी यासारख्या सार्वजनिक सुविधांच्या वापरामधे शिस्त आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे केले.कर्जत शहर व  तालुक्यातील विविध विकास कामांचे  भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित  सभेत  उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूल   राज्यमंत्री अब्दुल सत्तार,  सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, आ.राजेंद्र पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शासन व्यवस्था चालविताना अनेक अडचणी येतात. कोरोना, निसर्ग तसेच तौक्ते चक्रीवादळ,  अतिवृष्टीमुळे आर्थिक विकास मंदावला होता परंतु आता आर्थिक परिस्थिती पूर्ववत होत आहे.विकास कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात मात्र सर्वांच्या सहकार्याने त्यावर मात करण्यात येईल. विकास कामे करताना भेदभाव न करता सर्वांना निधी देण्यात येईल. भविष्यात या भागात नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार असून तरुणांनी समाजकारण करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

No comments