web-ads-yml-728x90

Breaking News

बारवी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याचा प्रचंड भ्रष्टाचार;घराचे खोटं मुल्यांकन दाखवुन भ्रष्टाचार करणार्‍या अधिकारी दलालावर गुन्हे दाखल करण्याची मांगणी

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

बारवी धरणाखाली गेलेल्या 22 गांवे पाडयातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यापैकी अनेक शेतकयाना जमिनीचा घराचा मोबदला भुखंडे घरे मिळाली नाहीत गांवठाण नाहीत घरे बांधली त्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्याकडे शासनाचे जाणुन बुजून दुर्लक्ष झाल्याने संबधित अधिकारी आणि दलाल ठेकेदारानी काही कोटीचा भ्रष्टाचार केला आहे त्याची चौकशी करून संबधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मांगणी प्रकल्पग्रस्त शेतकर्यानी केली आहे.

      बारवीडॅम प्रकल्पग्रस्ताच्या जमिनी कवडीमोलात घेवुन बारवी धरणाची उंचीवाढवून 22 गांवे पाडे वाडया परिसरातील शेतकर्याना भुमिहिन करून त्यांच्या नांवावर एमआयडीसीचे अधिकारी दलाल ठेकेदारी करत आहेत अन्नधान्य वस्तु वाहानेभाडे घरभाडे घेवुन हे भाडे आमापसंपत्तीचे मालक झाले मात्र गोरगरीब आदिवासी भुमिहिनाना जमिनीचा मोबदला नाही त्याच्या वारसाना नोकर्या नाहीत प्लॉट नाहीत सरकारने गरीबाचे टाळु वरचे लोणी खाणे बंद केले पाहिजे अशा संप्तत प्रतिक्रिया गरीब भुमिहिन शेतकर्यानी व्यक्त केल्या आहेत.     

             बारवी धरणाच्या बाधित श्रेत्रात बोगस घराच्या घरपट्टया दाखवुन मोठी घरे दाखवुन कोटी रूपये हाडप केले त्याचा विधानसभेत स्थानिक आमदारानी जाब विचारला होता त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुरबाड तहसिलदार सह एक पथकाची नेमणुक केली होती त्याची चौकशी गुलदस्त्यातच आहे.गेले अनेक वर्षे बारवी डॅम धरण ग्रस्ताच्या नावाने अधिकार्याची दररोज दिवाळी साजरी होत आहे.दलाल ठेकेदाराची चांदी आली आहे.काहीनी एमआयडीसीच्या प्लॉटवर डल्ला मारला आहे तर एमआयडीसीच्या अधिकार्यानी रिर्जव्ह खुल्याजागा प्लॉट म्हणुन काळयाबाजारात विक्री केली आहे 

        नदी नाले मध्ये भराव करून झालेली बांधकामे म्हणजे स्थानिक शेतकर्याच्या जमिनी हाडप करून आमाप संपत्ती मिळवण्याचा गोरस धंदा अधिकारी लोकप्रतिनिधी ठेकेदार दलाल करत असताना ज्याच्या जमिनी गेल्यात भुमिहिन झालेत त्यांना शासनाच्या विरोधात मोर्चे आंदोलने करून संघर्ष करावा लागत आहे.याकडे शासनाने लक्ष वेधावे अशी मांगणी काही पिडीत शेतकर्यानी केली आहे.

No comments