web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये मोठया उत्सहाने भारतीय संविधान दिन साजरा

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

संविधान दिना निमित्त मुरबाड मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य भारतीय संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार आर्पण करून संविधानाचे वाचन सचिन वाघचौडे यांनी केले.त्यावेळी मान्यवर उपस्थितानी भारतीय संविधानाला मानवंदना दिली.यावेळी प्रचंड संख्येने मान्यवर उपासक कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते.तदनंतर भारतीय संविधान रॅली मुरबाड बाजारपेठेतुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ नेवुन महामानव डॉ.बाबासाहेबाना पुष्पहार आर्पण करून तेथील हॉल मध्ये संविधनाचे महत्व मान्यवरानी पटवुन दिले यावेळी विविध श्रेत्रातील मान्यवर कार्यकर्ते समाजबांधव पत्रकार उपस्थित होते.या भारतीय संविधान कार्यक्रमाला मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे, मुख्याधिकारी परितोष कंकाल हे उपस्थित होते.

No comments