web-ads-yml-728x90

Breaking News

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव अहमदनगर

जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वार्डाला भीषण आग लागल्याची घटना आज घडली. या वार्डात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील 6 जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. तर 11 जण गंभीर अवस्थेमध्ये असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली.घटनास्थळाचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून यात रुग्णांच्या नातेवाईकांचे रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज स्पष्टपणे एकू येत आहेत. तसेच संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. दरम्यान ही ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

No comments