web-ads-yml-728x90

Breaking News

संत साहित्य विविध भाषांमध्ये भाषांतरित व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्र राज्य साहित्याचा सागर आहे. येथील साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य भाषांतरित होऊन इतर राज्यात पोहोचल्यास अनेक लोकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.उत्तराखंड राज्याच्या साहित्य, संस्कृती, इतिहास व पर्यटनाचे दर्शन घडविणाऱ्या हिंदी मासिक विवेकच्या उत्तराखंड विषयक दिवाळी विशेषांकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.‘उत्तराखंड देवभूमि से विकासभूमि’ विशेषांक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, उद्योजक पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिंदी विवेकचे व्यवस्थापकीय संचालक अमोल पेडणेकर, कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर तसेच मूळचे उत्तराखंड राज्यातील व आता महाराष्ट्र निवासी असलेले मान्यवर उपस्थित होते.

No comments