web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून मुंबईतून एकाला अटक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे.महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडूनकेलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आलेश्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पातमे तेज स्टीलमे गजानन एंटरप्रायझेसया नावेमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत. ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्रीव्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. श्री. अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांनी विविध कंपन्यांकडून रु. 105 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगेकोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू. 18.91 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला.अत्ताउल्हा मोहम्मद नईमचौधरी यांचे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 च कलम 132 (1) (b) व (C)नुसार गुन्हा असूनकलम 132(1) (i) नुसार कमीतकमी महिनेजास्तीत जास्त वर्ष तुरूंगवासआणि दंड- इतक्या शिक्षेस पात्र आहे. तसेच या कायदयाच्या कलम 132 (5) नुसार अपराध दखलप्राप्त व अजामिनपात्र आहे.त्यामुळे अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

No comments