web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्रातील ६ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान; उद्योजक आनंद महिंद्रा यांना ‘पद्मभूषण’ प्रदान

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवनवी दिल्ली

सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आज सायंकाळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.   

दरवर्षी  प्रजासत्त्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.  राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आज सकाळी वर्ष 2020 च्या काही पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सकाळी पार पडलेल्या समारोहात 4 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वर्ष 2020 च्या उर्वरित पद्म पुरस्काराचे वितरण  सायंकाळी करण्यात आले. यामध्ये एकूण 6 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

No comments