web-ads-yml-728x90

Breaking News

राज्याबाहेरील व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज केली.  सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून  स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे राज्याबाहेरील व देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल व मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास  श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

No comments