web-ads-yml-728x90

Breaking News

६५ गांवांना स्मशानभुमि अभावि उघड्यावर उरकावा लागतो अंत्यविधी

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यातील भाजपाचा हायटेक विकास वाड्या पाड्या पर्यत पोहचला नसल्याने ,आजही ६५गांवांना स्मशानभुमि अभावि उघड्यावर अंत्यविधी उरकावा लागतो, तर ६०वाड्या पाड्यावर रस्ता नसल्याने पायवाटेनेचं पायपिट करावी लागते, रस्त्या अभावी रूग्ण,गरोदर महिलां ना उपचारा अभाविच बळी जाण्याच्या घटना नित्याच्या झाल्या असून, भाजपाचे सभापती च्या गावातील अदिवासी वाडीची जागा बळकावण्यासाठी त्यांचा  रस्ताच परप्रांतिय फार्महाऊस वाल्याने बंदकेल्याने सराई वाडीतील अदिवासीला उपचारासाठी जंगलातील दोन किलोमिटर पायवाटेवरून  डोली करून नेत असता उपचारा अभावी आपला जिव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

        तालुक्यापासुन २१ किमी अंतरावरील साखरे धारगांव ग्रामपंचायतीच्या हद्दित येणारी सराईवाडी १५ घरं व ५५ लोकवस्ती असलेल्या या वाडीला गावात येण्यासाठी ,किवां बाजारहाट करण्यासाठी, पाणी भरण्यासाठी, एकमेव असलेला रस्ता येथील मुंबईचे फार्महाऊस धारक कुलदिपसिंग अरोरा  मंगलसिंग गुप्ता या परप्रांतियाने अडवून तो रस्त्यावर भिंत बांधून बंद केला, हा रस्ता बंद केल्याने येथील वाडीतील नागरिकांना जंगलातुन दोन किलो मिटरचा फेरा मारावा लागतो, हा रस्ता खुला करावा म्हणून गेले पाच वर्ष येथील तरूण दिपक सराई अशोक, अभय दौलत वरूण भगवान विनय सराई तरूण, तहसिलदारांकडे हेलपाटे घालतात परंतु हा रस्ता वरील फार्महाऊसवाले देण्यास तयार नाहीत, कारण हा रस्ता अदिवासीना मोकळा केला तर ते येथेच राहतील व त्यांची जागा बळकावता येणार नाही, त्यांना अशाच पणे अडकवुन ठेवले की ते हि वाडी सोडून ईतरत्र जातील, व जागा आयतीच घशात घालता येईल या धोरणांने रस्ता बंद केल्याचा जबर फटका गेल्या वर्ष भरापासून या वाडीला बसु लागला पार्वतीबाई धर्मा सराई,धर्मा पांगो सराई  व आज  वनसु धाको  सराई च्या मृत्यूचा फटका  या सराई वाडीला बसून  आला आहे , या सराई वडीवरील सुशिक्षित  समर्थसेवेचे जेष्ट निरूपणकार हभप  नवसु धाको सराई यांची तब्बेत अचानक बिघडली म्हणून दि,८नोव्हेबरच्या रात्रीत वाडीतील तरूणांनी डोली करून दवाखाण्यात नेत असता दोन किलो मिटरच्या फे-यांत रस्त्यातच बळी गेल्याची हदयद्रावक घटना दिपावलीच्या सणासुदी घडली आहे ,विशेष म्हणजे हि घटना भाजपा चे सभापती दिपक पवार यांच्या गावात घडली असुन, हा फार्महाऊस देखील संरक्षणभिंत आतील उत्खनन  बेकायदेशीर असून महसुलविभागाच्या भोंगळकारभार व मेहरबानीवर तसेच  सभापती दिपक पवारांच्या संगनमताने सुरू असल्याची खंत तक्रारदार दिपक सराई यांनी दै,सामनाशी दुरध्वनी वरून दिली गेल्या पाच वर्षा पासुन रस्त्यासाठी तढतोय किमान पायवाट तरी दिली असती तर एकाच वाडीती ते दोव  नवसु सरांई  अशा तीन जणांचा  उपचारा अभावी बळी गेला नसता अद्याप किती बळी घेणार हि खंत येथील अदिवासी व्याक्त करतात 

No comments