web-ads-yml-728x90

Breaking News

सारथी फाऊंडेशनच्या वतीने 26/11 मधील शहीदांना कॅन्डल लावुन अर्पण केली श्रध्दांजली

 


BY - भरत व्होसमनी, युवा  महाराष्ट्र  लाइवठाणे

13 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी देशावर झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाक पुरस्कृत 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. सारथी फाऊंडेशनच्या वतीने 26/11/2021 रोजी इंदिरानगर नाका,वागळे इस्टेट ठाणे येथे श्रध्दांजली अर्पण आयोजन केले होते.

 मुंबईवर झालेला दशहतवादी हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता. देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला. त्यामध्ये मुंबई पोलीसांनी शौर्याची परिसीमा गाठली. केवळ मराठीच नव्हे तर, संबंध भारतीय मनोधैर्य एकवटले. वीर जवान तुकाराम ओंबळे यांनी निशस्त्र असतानाही क्रूरकर्मा दहशतवाद्याला जेरबंद करण्यासाठी बलिदान पत्करले. पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी गोळ्या झेलून, अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भ्याड हल्ल्यांना भीक घालण्याची, आव्हानांवर मात करण्याचे मनोधैर्य आणखी उंचावेल ते पुढच्या पिढ्यांमध्ये विकसित व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आणि निष्पाप बळींना हीच आदरांजली ठरेल असे यावेळी सारथी फाऊंडेशनचे श्याम प्रजापती,मनोज यादव,संकेत पठारे,सुरज विश्वकर्मा,आकाश भगत,परवेज खान यांनी यावेळी सांगितले.यावेळी सिध्दार्थ कांबळे,श्रीगोपाल सिंह,रविंद्र प्रजापती,अर्जुन चेमटे सर, अमितचंद्र राजपुत सर विविध श्रेत्रातील मान्यवर पोलिस,पत्रकार उपस्थित होते.

No comments