अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या इ.११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) प्रवेश फेरीमधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिली आहे. कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.उपरोक्त क्षेत्रांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी फेरी समाप्त होत आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, काही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करावयाचा आहे, तसेच काही विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत. दरम्यानच्या काळामध्ये काही सुट्टया आलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी यापुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
No comments