नगरविकास व बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काम करण्याचे दिले आदेश;आगरी समाज नेते श्री जयेंद्र दादा खुणे यांच्या पुढाकाराने जसखार ग्रामस्थांना दिलासा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
उरण येथील "युवा सामाजिक संस्था जसखार " या सेवाभावी सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने जसखार गावातील व सुप्रसिध्द जागृत देवस्थान श्री रत्नेश्र्वरी देवी मंदिर प्रकरणी लक्ष वेधले असून वारंवार अन्याय विरुद्ध तक्रारी करून देखील कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर ग्रामस्थां पैकी श्री.नितीन पाटील( मा.सरपंच ) , श्री.हर्षल महेंद्र ठाकूर (अध्यक्ष,युवा सामाजिक सस्था, जसखार),श्री.सचिन लहू ठाकूर ( नृत्त दिग्दर्शक ,संचालक,श्री रतनेश्र्वरी कला मंच ) यांनी आगरी समाज नेते श्री. जयेंद्र दादा खुणे यांच्याकडे धाव घेतल्याने जे.एन.पी.टी. करीत असलेल्या सिंगापूर टर्मिनल ( PSA) ब्रीज उत्खणाच्या फायलींगच्या मनमानी कामामुळे जे.एन.पी.टी.च्या विरोधात श्री. जयेंद्र दादा खुणे यांनी ग्रामस्थांना व मंदिराला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेवून लक्ष वेधले आहे.
ह्या कंपनीच्या कंटेनर व ट्रेलरच्या वाहतुकीसाठी नियोजित रस्ता हा गावाच्या चारही बाजूने होत असून परिणामी ह्या महामार्गावरील उड्डाण पुलामुळे व ग्रामस्थांच्या घराच्या तसेच ४ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या रायगड जिल्ह्यातील तसेच उरण तालुक्यातील जागृत सुप्रसिद्ध श्री रात्नेश्र्वरी मंदिराला तडे गेल्याने मंदिराचे बांधकाम निकामी होत आहेत . तसेच गावातील घरांना हादरे बसत असून ग्रामस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने हे प्रकरण उघडकीस आणून मा.श्री.भगतसिंग कोश्यारी साहेब( राज्यपाल - महाराष्ट्र ) , मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब( मुख्यमंत्री - महाराष्ट्र ), श्री.आदित्यजी ठाकरे ( राज शिष्ठाचार तथा पर्यावरण मंत्री ) श्री.एकनाथजी शिंदे (नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री) , मा.श्री. राजारामजी साळवी साहेब ( आगरी सेना प्रमुख ),श्री. प्रदिपजी साळवी ( आगरी सेना नेते) अदिती तटकरे ( पालकमंत्री - रायगड) , श्री.राज ठाकरे ( अध्यक्ष - मनसे ) ,श्री सुनील तटकरे( मंत्री ) , डॉ. महेंद्र कल्याणकर ( जिल्हाधिकारी- रायगड ), श्री. महेश बालदी ( आमदार ) , श्री भाऊसाहेब अंधारे ( तहसीलदार - उरण) ,श्री.सचिन सावंत वे( सहाय्यक पोलिस आयुक्त ) , यांना निवेदन दिलेली आहेत. उड्डाणपुलावरील दळणवळणासाठी लागणाऱ्या भरवामुळी गावातील सांडपाणी व पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे भविष्यात जसखार गाव हा पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर प्रोजेक्टला गावकऱ्यांचा विरोध असून मंदिराला लागून बांधत असलेला ब्रीजची दिशा बदलावी व संपूर्ण झालेली नुकसान भरपाई जे.एन.पी.टी.ने द्यावी अशी मागणी युवा सामाजिक सस्थेनी केली आहे. आगरी समाज नेते जयेंद्र दादा खुणे यांच्या नेतत्वाखालील श्री. एकनाथ शिंदे ( नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री) यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली असता श्री. एकनाथ शिंदे यांनी जे.एन.पी.टी.ला स्वतः फोन वर बोलून सदर काम हे ग्रामस्थांच्या सोयीनुसार व त्यांना जसे हवे आहे त्याप्रमाणे करण्यात यावे असे आदेश दिले. ग्रामपंचायतचे श्री. दामोदर घरत , जसखार गावातील ज्येष्ठ नागरिक श्री.विठ्ठल पांडुरंग ठाकूर, श्री.रमाकांत म्हात्रे ( मा.सरपंच), यांच्या सोबत युवा सामाजिक संस्था व श्री. रत्नेश्र्वरी आरती मंडळातील सर्व पदाधिकारी सभासद सहकार्य करीत आहेत. मा आमदार श्री. मनोहर शेठ भोईर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस श्री.प्रशांत पाटील, मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.अतुल भगत यांचेही सहकार्य लाभले आहे.
No comments