देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सैनिकांसोबत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सैनिकांसोबत आहे. ज्या सैनिकांनी देश सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही, असे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने सुदर्शन भारत परिक्रमा व ब्लॅक कॅट कार रॅलीचे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आले होते. या कार रॅलीला श्री.कोश्यारी यांनी झेंडा दाखविला. यावेळी एनएसजीचे महानिरीक्षक अभिषेक त्रिवेदी, कार रॅलीचे प्रमुख कर्नल उमेदसिंग राठोड, 26 स्पेशल कॉम्पॅजिट ग्रुपचे ग्रुप कमांडर कर्नल नितेश कुमार यांच्यासह एनएसजीचे जवान उपस्थित होते.
No comments