web-ads-yml-728x90

Breaking News

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत असलेल्या शंकांचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक येथे केले निरसन; पत्रकार परिषद घेवून वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव नाशिक

सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती संदर्भात येत असलेल्या विविध शंका व उलट-सुलट  बातम्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेवून खालील प्रमाणे वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडलीकोविड साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास १०० % रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यास अनुसुरून आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन यांची नेमणूक केली आहे. शासनाच्या परवानगी नुसार गट क मधील ५२ संवर्गातील २७३ ९ रिक्त पदे भरण्यासाठी दि . ५.८.२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती . त्यास अनुसुरून ४०५१६३ अर्ज प्राप्त झाले . याबाबतची परीक्षा मे . न्यास यांचेमार्फत दि . २४.१०.२०२१ रोजी घेण्यात येणार आहे . सदरील भरती परीक्षा राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गांसाठी घेण्यात येत आहे . राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबंधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणूक अधिकारी ८ उप संचालक मंडळे आहेत . उपरोक्त परीक्षार्थीना प्रवेश पत्र निर्गमित करण्याची कार्यवाही दि . १५.१०.२०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु झाली असून आज सकाळी १० वाजेपर्यंत २४१५ ९ ० उमेदवारांनी प्रवेशपत्र download केले आहे . यापैकी २८६ ९ उमेदवारांनी परीक्षेबाबत तक्रारी केल्या आहेत .

No comments