web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत विनर्स स्पोर्ट्स क्लब (वसई विरार) च्या खेळाडूंनी मिळवले घवघवीत यश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

रविवार दि.२४/१०/२०२१ रोजी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत विनर्स स्पोर्ट्स क्लब (वसई विरार) च्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले व त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्या मध्ये कु.आयुष पाल (सुवर्ण पदक) कु.ओमकार शेलार (सुवर्ण पदक) कु.खुशी मौर्या (सुवर्ण पदक) कु.प्रेरणा बांबरस (रौप्य पदक) पटकावले.श्री.सागर शेलार सर यांनी या मुलांना प्रशिक्षण दिले.व श्री.सचिन देसाई साहेब (नगरसेवक),श्री.धोंडिबा सुर्वे साहेब,श्री.पांडुरंग पाटील साहेबयांनी मुलांना मार्गदर्शन दिले.स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड झोन 2 चे डीसीपी श्री मंचक इप्पर साहेब,श्री विश्वजीत श्रीरंग बारणे युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख, श्री संतोष जी बारणे चेअरमन महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन, ,श्री सचिन जी भोसले नगरसेवक शहर प्रमुख शिवसेना पिंपरी चिंचवड ,श्री रुपेश कदम शहर समन्वयक पिंपरी चिंचवड युवासेना ,श्री पंकज दीक्षित ,प्रवीण काळे सेक्रेटरी महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन मंदार पनवेलकर उपाध्यक्ष महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन, संतोष खंदारे उपाध्यक्ष महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित होते.ह्या स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशन व श्री इक्बाल शेख व टीमचा वतीने करण्यात आले होते.

No comments