वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
पुरातत्व पर्यटकांनी वारसा स्थळांना भेट द्यावी आणि त्यांना त्या स्थळांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. याचा राज्याला आणि देशाला निश्चितच लाभ होईल. यासाठी पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय संस्थेच्या समन्वयाने योजना तयार करावी, अशी सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद सर्कलमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे डॉ मिलन चौले, डॉ. राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.
No comments