web-ads-yml-728x90

Breaking News

राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम  आहे. मात्र विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार जयंत आजगावकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, संस्थेचे विजय वैद्य,प्रा.बी.आर.शर्मा हे उपस्थित होते.

No comments