मुरबाड शहरात प्रथमच प्रभागीय लसीकरण उपक्रम संपन्न:चौधरी दाम्पत्याचे मुरबाड तालुक्यात कौतुक
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे
मुरबाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये माजी नगरसेविका साक्षी चौधरी यानी कोविड लसीकरण राबविले या लसीकरणाचा लाभ २०० जनानी घेतला.
मुरबाड शहरात प्रथमच आमदार किसन कथोरे यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतिच्या प्रभाग क्रमांक 13 उगले आलीमध्ये प्रथमच माजी नगरसेविका साक्षी संतोष उर्फ बाबू चौधरी यांच्या अथक प्रयासाने १८ वर्षांवरील सर्वांसाठी अशोक राखाड़े यांच्या घरासमोर मुंजोबा मंदिर, राकेश शहा यांचा वाडा येथे कोविड लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रभागातील व शहरातील अनेकांनी या लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घेतला.संतोष उर्फ बाबू चौधरी यांनी कोरोनाच्या काळात अनेक लोकांना जीवनदान देण्याचे जसे काम केले आहे तसेच आपल्या प्रभागात कोविड लसीकरण राबवून तब्बल २०० च्या वर नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळवून दिला.असे लोक लाभदायक उपक्रम राबवित असल्याने माजी नगरसेविका यांचे प्रभागातील व मुरबाड शहरातील नागरिकांनी आभार मानले.
No comments