web-ads-yml-728x90

Breaking News

उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर

उद्योग क्षेत्रात कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी उद्योग संस्थांनी या क्षेत्रात शिबिर घेऊन मतदानाची टक्केवारी वाढेल, याबाबत प्रयत्नशील राहावे, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसिलदार राहूल सारंग उपस्थित होते.राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यांच्या मतदारयादीचे विश्लेषण करण्यात येते. सर्वसामान्यपणे, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी 60 ते 70 टक्के असते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनर्रींक्षण कार्यक्रमातंर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग क्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे मतदानाविषयी जनजागृती करण्यात येवून नवमतदारांना मतदान नोंदणी प्रक्रियेची माहिती जसे छायाचित्र, नाव, आवश्यक कागदपत्रे, आदीची माहिती देवून जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

No comments