web-ads-yml-728x90

Breaking News

ठाण्यात मराठा मंडळ,तर्फे दसरा – सीमोल्लंघन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

गेली ६० वर्षे सातत्याने  कार्यरत असणाऱ्या मराठा मंडळ ठाणे या सामाजिक संस्थेतर्फे १५ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वा  दसरा सण उत्सव  अतिशय उत्साहात  साजरा करण्यात  आला.छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केद्राच्या  प्रवेशद्वारावर झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण  लावण्यात आले मराठा मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष जनार्दनराव काळे, यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत  मराठा मंडळाच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली .चिटणीस राजेंद्र साळवी यांच्या हस्ते  मराठा मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत   भगवा ध्वज फडकविण्यात आला.  या वेळी मंडळाचे चिटणीस राजेंद्र साळवी, यांनी मराठी  सणाच्या काही महत्वाच्या गोष्टी दसरा सीमोल्लंघन  शास्त्र आणि शस्त्र पूजनाचे महत्व सांगितले दसरा सण हा खरोखरच आनंदाची उधळण करणारा आहे.प्राचीन काळापासून क्षत्रियलोक युद्धाला जाण्यासाठी दसरा या दिवसाची निवड करत होते.दसर्‍याच्या दिवशी केलेल्या युद्धा मध्ये विजय निश्चित मिळतो. असे त्यांचे मानणे होते. चिटणीस राजेंद्र साळवी यांनी नुकत्याच पूर्ण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्राबद्दल माहिती दिली . तसेच हे सांस्कृतिक केंद्र सर्व समाजासाठी खुले असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मंडळींनी एकमेकांना मनापासून शुभेच्छा देवून  आपट्याची पाने वाटण्यात आली .याप्रसंगी खजिनदार प्रदीप जगताप सचिन कदम आदी मान्यवर उपस्थित होते असे आपल्या प्रसिद्धी पत्रकात मंडळाचे चिटणीस राजेंद्र साळवी यांनी कळविले आहे.

No comments