web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणीBY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतीमध्ये आधुनिकता आणता आली. त्यामुळे  शेतीमध्ये उन्नती झाली असल्याची भावना राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्याशी  संवाद साधतांना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.प्रगतशील शेतकरी कृषीभूषण डॉ.दत्तात्रय बने, सुरसिंग पवार, मच्छिंद्र घोलप, विष्णू जरे, मेजर ताराचंद घागरे, राजेंद्र वरघुडे, प्रविण गाडे, मारूती गिते, प्रणव धोंडे, सविता नारकर, शिवाजी थोरात, संजीव माने, श्रीनिवास बागल, रामदास थेटे, राहुल रसाळ, सारंगधर निर्मळ, रविंद्र कडलग, अशोक खोत या शेतकऱ्यांनी राज्यपालांशी संवाद साधला.यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनचा लाभ घेत आपल्या कल्पकतेने शेती करत उन्नती साधली. ही प्रशंसनीय गोष्ट आहे. काळानूरूप शेतकऱ्यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला तर शेती निश्चित फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांनी सकारात्मक विचार करत काम केले पाहिजे. सेंद्रिय शेती व जीआय टेक्नॉलॉजीचे ज्ञान शेतकऱ्यांनी प्राप्त केले पाहिजे. यातून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. शेतीमधील नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. ‘उत्तम शेती, मध्यम उद्योग, निकृष्ट नोकरी’ अशी पूर्वापार धारणा आहेच. कोरोना काळात सर्व बंद होते. मात्र शेती सुरु होती. शेतकरी शेतीत राबत होता, असेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

No comments