web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड कुडवली धानिवली आयटीआय मध्ये मनमानी भ्रष्टाचार कारभार;प्रा आघाव यांना निलंबित करा - नामदेव शेलार

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड ,ठाणे

मुरबाड तालुक्यात सध्या भ्रष्टाचाराचा पुर उतु आला आहे.तालुक्यातील विविध ठिकाणी विविध विभागात मनमानी भ्रष्टाचार सुरू आहे याकडे अघाडी सरकारचे दुर्लक्ष होते की जाणुन बुजून करते हे मात्र गुलदस्त्यात म्हणावे लागेल असाच प्रकार मुरबाड मधील कुडवली आयटीआय मुरबाड धानिवली आयटीआय मध्ये मनमानी भ्रष्टाचार झाल्याचे समजते याची तक्रार स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी थेट मुख्यमंत्री ,सार्वजनिक बांधकाम मंत्री,लोकआयुक्त यांच्याकडे केली आहे. 

शासनाने मुरबाड कुडवली धानिवली आयटीआय याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून विद्यार्थी प्रवेश अर्ज ,शिक्षण, शिक्षक वसतिगृह बांधकाम ,वाहने ,इमारत दुरूस्ती असे अनेक असुविधादायक भ्रष्टाचार या आयटीआय मध्ये झाले असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

 या संबधित भ्रष्टाचाराचा मोरक्या प्रा.आघाव असुन त्यांना तात्काळ निलंबित करा असे सुध्दा यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी सांगितले.

No comments