मुरबाडच्या पोलिसांनी चोराच्या आवळया मुसक्या;मुरबाड पोलिसांचे सर्वत्र कौतुक
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे
मुरबाड पो स्टे हद्दीत दि 20/9/21 रोजी दोन डेम्पो चोरी झाले होते.त्याबाबत् मुरबाड पो स्टे.ला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात पोलिसांना एक बाब निदर्शनास आली टेम्पो मालक् यांनी ज्याचे कडून यांनी दोन्ही टेम्पो खरेदी केले होते त्याने तक्रार दारास एकच चावी दिली होती, दोन्ही टेम्पो Electric बनावटीचे होते डुप्लिकेट चावी ने चालू होणाऱ्या नव्हत्या हाच धागा पकडूं ,कौशल्य पुर्वक तपास करून,मुरबाड पो स्टे च्या गुन्हे प्रकटिकरण पथकातील पोलिसांनी आरोपी अटक करून ,दोन्ही टेम्पो हस्तगत केले व सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. नजीकचे काळात घडलेली हिं मोठी चोरी उघडकीस आणण्यात मुरबाड पोलिसांना यश आल्याने त्यांचें मुरबाड नगरीत कौतुक होत आहे. सर्व सामान्य जनतेला पोलिसा कडून होत असलेल्या गुन्हे प्रतिबंधक उपाय योजना व कारवाई मुळे सुरक्षा वाटते आहे व गुन्हे गारामध्ये गुन्हे करण्याचे धाडस राहिले नाही. मुरबाड तालुक्यात नव्याने रूजु झालेले पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी बंद झालेली रोड पेट्रोलिंग 24 तास सुरू केली असुन मुरबाडकरानी सुटकेचा श्वास घेतला आहे.तालुक्यात होणार्या गुन्हयावर माझी करडी नजर असुन गुन्हेगाराला थारा मिळु देणार नाही असे यावेळी पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी (YML NEWS) युवा महाराष्ट्र लाइवशी बोलताना सांगितले.
No comments