web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन आहे, यापुढेही राहील – जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे वालचंद स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाराष्ट्र पूर्वीपासूनच भारताच्या विकासाचे इंजिन होता, आहे आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. मात्र विकासाची गती वाढविण्यासाठी आपल्या सर्वांनाच कार्यक्षमता आणखी वाढवावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्रीजच्या वतीने आज वालचंद स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ‘महाराष्ट्र : भारताच्या विकासाचे इंजिन’ या विषयावर श्री.पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष ललित गांधी, आशिष पेडणेकर, अनिलकुमार लोढा, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, संजय दादलिया आदी उपस्थित होते.

No comments