तलाठी संघटनेने पुकारले आंदोलन;शेतकर्याच्या कामावर परिणाम
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
ई-महाभुमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी यांनी तलाठी संर्वगा संदर्भात असंविधानिक शब्द वापरल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष आगिवले यांनी तहसिलदार प्रांत अधिकार्याना निवेदन देवुन काम बंद आंदोलन पुकारले आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी हे महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतीमान व पारदर्शक करणे व महसुली उत्पन्नात वाढ करून राज्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणेसाठी रात्रदिवस काम करत आहेत मात्र रामदास जगताप ई- महाभुमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी यांनी राज्य तलाठी संघाच्या अध्यक्षा तथा तलाठी व मंडळ अधिकारी यांना अर्वाच्च भाषा वापरून अपमान केल्याने संपुर्ण महाराष्ट्रात तलाठी मंडळ अधिकार्यानी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने शेतकरी वर्गाची कामे ठप्प झाली आहेत.
No comments