ड्रॅगन इंडियन कराटे वेल्फेअर असोसिएशन मुरबाड यांनी राबवला स्वच्छ भारत अभियान
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे
स्वच्छ भारत अभियान दिनांक 31/10/2021 रोजी नेहरू युवा केंद्र ठाणे भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रॉगन इंडियन कराटे वेल्फेअर असोसिएशन मुरबाड यांनी स्वच्छ भारत अभियान उपक्रम आज घौडदेश्वर मंदिर शिरगांव रोड मुरबाड येथे राबवला.या स्वच्छ भारत अभियान युवा कार्यक्रमात 38 युवक युवती तसेच जेष्ट नागरिक संस्था व सर्व पदाधिकारी पत्रकार विविध श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या स्वच्छ अभियान वेळी डॅ्रगन इंडियन कराटे वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष लक्ष्मण घागस सचिव वसंत जमदरे सर जेष्ट पत्रकार नामदेव शेलार विविध मान्यवरानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.ब्लॅकबेल्ट विद्यार्थी हर्ष लाटे शाहरूख पठाण अंजली पासवान एश्वर्या देसले प्रज्ञा रायकर व सर्व विद्यार्थ्यांना कराटे मास्टर वसंत जमदरे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले.यावेळी सहभाग सर्व युवक युवतींना नेहरू युवा केंद्र ठाणे भारत सरकार चे सहभागी प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
No comments