web-ads-yml-728x90

Breaking News

चाईल्ड केअर सामाजीक संस्थेतर्फे साडी व अन्नधान्य वाटप

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – उरण

उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी वाडीत महिलांना साड्या आणी धान्य वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेता दिग्दर्शक राजू पाटील (पप्पूराज ),नवघर गावचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष जयप्रकाश पाटील तसेच नवघर ग्रामपंचायत सदस्या मयुरी पाटील यांच्या उपस्थितीत चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे तर्फे 250 साड्या 100 किलो अन्न धान्य वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम  संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष  विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, कार्याध्यक्ष विक्रांत कडू, कार्याध्यक्ष ह्रितिक पाटील,कोषाध्यक्ष मनोज ठाकूर  मुख्यसचिव आभिषेक माळी   , सदस्य आमोल डेरे, विपुल कडू  आदींनी खूप मेहनत घेतली.  पप्पूराज पाटील आणी जयप्रकाश पाटील यांनी मनोगत मांडताना चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांच्या संस्थेचे कौतुक करताना म्हणाले की अशी आदिवासी वाडीत कामे करणारी उरण तालुक्यातील पहिलीच संस्था आहे.चाईल्ड केअर संस्था गेली पाच वर्ष गोर गरिबांना, विविध पद्दतीने मदतीचा हात देत आहे त्या बद्दल संस्थेच्या सर्व सभासदाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.असे मत व्यक्त केले.ह्या कार्यक्रमास विशेष सहकार्य तुषार ठाकूर (भेंडखळ ), नारी शक्ती महिला ग्राम संघ भेंडखळ, सावित्रीबाई फुले महिला ग्राम संघ भेंडखळ, आणी नीतिशा ओमकार पाटील यांचे लाभले.  ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विकास कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रांत कडू यांनी केले

 

No comments