web-ads-yml-728x90

Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील कायमस्वरुपी विद्युत रोषणाई प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. यावेळी पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार श्री. राहूल शेवाळे, आमदार श्री. सदा सरवणकर, महानगरपालिका सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर विद्युत रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण केले. मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे व सर्व मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. मैदान परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघणाऱ्या परिसराचे अवलोकन करतानाच सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीने व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

No comments