web-ads-yml-728x90

Breaking News

मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पुनरीक्षण कार्यक्रम राबविणार आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेले नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जाते. याच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ हे लक्षात ठेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावे. आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावा. जसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन  इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा.बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नसून मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावा, 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात यावे.

No comments