web-ads-yml-728x90

Breaking News

निशस्त्र पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षकपदाची संधी; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली तत्वतः मान्यता

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

निशस्त्र पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्तावित निर्णयाला तत्वतः मान्यता दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रस्तावित निर्णयामागची भूमिका स्पष्ट करतांना गृहमंत्री म्हणाले, पदोन्नतीसाठी लागणारा कालावधी दीर्घ असल्याने बहुतांश अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता यावे या उद्देशाने हा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे.पोलिस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती साखळीमधील पोलिस नाईक या संवर्गाची पदे व्यपगत करून पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक याप्रमाणे संवर्गामध्ये वर्ग करून समायोजित करण्याच्या निर्णयाला तत्वतः मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे या संवर्गामध्ये भरीव वाढ होऊन एकूण १५,१५० अंमलदारांना पदोन्नतीच्या संधी त्वरित प्राप्त होतील.

No comments