web-ads-yml-728x90

Breaking News

महानगर सफाई कर्मचारी संघाचा कामगार मेळावा संपन्न

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव  डोंबिवली ,ठाणे

महानगर सफाई  कर्मचारी संघाचा कामगार मेळावा नुकताच संपन्न झाला आहे.महानगर सफाई कर्मचारी संघ आयोजित केडीएमसी 1 च्या वाहनचालक सफाई  कर्मचारी यांचा मेळावा शुक्रवारी डोंबिवली पुर्वी येथील धर्मविर आनंद दिघे हॉल येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. 

सदर मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन महानगर सफाई  कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत गायकवाड सल्लागार मधुकर वालेकर उपाध्यक्ष डॉ.रविंद्र जाधव कायदेविषयक सल्लागार ॅड.अविनाश खोबरागडे उपाध्यक्ष रामचंद्र तायडे अमित साळवे प्रविण बेटकर ठाणे जिल्हा सचिव सुधिर राणे नेहिम खान आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष भारत गायकवाड यांनी सफाई  कर्मचारी वाहनचालक यांच्या समस्या त्यांच्या मांगण्याबाबत मार्गदर्शन केले आपले हक्क अधिकार मागत असताना कर्तव्य पुर्ण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments