मुरबाडच्या विकास कामाची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडुन पहाणी;दिव्यांग अधिकारी कांबळे सह वनअधिकारी ठेकेदारांची उपस्थिती
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे
ठाणे जिल्हयाच्या मुरबाड तालुक्यात झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग मुरबाड नगरपंचायत यांच्या विकास कामाची पहाणी करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मुरबाडला भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत नियोजनाचे अधिकारी खंदारे व दिव्यांग असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सत्यजित कांबळे वन अधिकारी तहसिलदार व पर्यटन तसेच विकासाचे मुख्य ठेकेदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे ठाणे जिल्हयात उत्कृष्ट काम आहे.तमाम शेतकरी शालेय विद्यार्थी प्रकल्पग्रस्त सर्व सामान्याना नेहमीच न्याय देण्याचे काम केले आहे.कोव्हीड कालामध्ये सुसज्ज कामगिरी करून लाखो लोकांचे जीव वाचवले कोणावरही अन्याय होऊ दिला नाही गुन्हे दाखल करून दिले नाही अशा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे स्वतंत्र संपादक पत्रकार संघा तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
ज्या विभागाच्या कामाची पहाणी केली किंवा चौकशी हे सर्वच विभाग जिल्हाधिकार्याच्या अंडर नाहीत मात्र नियंत्रण त्याचे आहे.त्यामुळे त्यांच्या पहाणी आहवालाने शासनाला किंवा लोकआयुक्ताना प्रत्यक्षीत आहवाल जावू शकतो यामध्ये शंका नाही.
मात्र तमाम जनतेला आम्ही सांगू इच्छीतो की स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी 26/08/2021 रोजी लोकआयुक्तांकडे मुख्यमंञ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते इमारती पर्यटनस्थळे माळशेज घाट डीपीडीसी ठक्करबाप्पा एसआयआर आदिवासी श्रेत्र रूग्णालय पर्यटन श्रेत्र खडडे स्मशानभुमी वृक्षलागवड दार्याघाट माळशेज पर्यटनस्थळे अशा सर्वच कामाची तक्रार लोकआयुक्तांकडे केली होती त्या तक्रारीत मुरबाड नगरपंचायतीचा तलाव सुशोभिकरण वृक्षलागवड पर्यटन प्युअरब्लॉक अशा अनेक कामाचा समावेश आहे.त्याची चौकशी करून संबधित सर्व अधिकार्याना नोकरीतुन बडतर्फ करण्यात यावे अशी आमची तक्रार होती त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी चौकशीसाठी आले असावे अशी खात्री आहे.
परंन्तु अधिकारी सांगणार काय पहाणी दौरा ज्या माळशेजघाटाच्या स्कायवॉकसाठी भाजपाच्या सत्ताकाळापासुन जिल्हाधिकारी साहेब किती वेळा येवुन गेले असावेत पर्यटनस्थळे तलावसुशोभिकरण वनविभागाची कामे अशा कामाची अनेक पहाणी केली असावी उदघाटनाला आले असावे त्यांना काचेच्या स्कायवॉकचे नवल नाही दुसरं पर्यटनाचे ठेकेदार सुहासशेठ मोठे यांनी दाखवलेली कामे जेथे उभे होते तेथील कामे टेंडर निघण्यापुर्वीच झाली आहेत मुरबाडला पर्यटनावर खर्च झाला मात्र दोनवर्षात एकही पर्यटक जिल्हाधिकारी साहेबानी तेथे जावू दिला नाही अशा सा.बां.बाबा भाऊ दादा आप्पा अन्ना व नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराला शासनाने मुठमाती देवु नये अशी अपेक्षा
No comments