web-ads-yml-728x90

Breaking News

पर्यावरण जपून शाश्वत विकास गरजेचा – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

पर्यावरण जपणे म्हणजे विकासाच्या विरोधात जाणे नसून पर्यावरण जपून शाश्वत विकास घडवून आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

वातावरणीय कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमृत नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी सहभागी झाले होते.या वेबिनारमध्ये माझी वसुंधरा १ चे विश्लेषण तसेच माझी वसुंधरा २ ची तयारी, पाणथळ क्षेत्रे, वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियमात करण्यात आलेली सुधारणा, रेस टू झिरो आणि कार्बन न्यूट्रॅलिटी त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहन धोरण व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची एककेंद्राभिमुखता या विषयांचा आढावा घेण्यात आला.

No comments