web-ads-yml-728x90

Breaking News

शिवळे महाविद्यालयात लसीकरण शिबीर उत्साहात संपन्न

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड, संचालित, शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे बुधवार दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी *मिशन युवा स्वास्थ  अभियाना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या निर्णयान्वये व डॉ. संजय जगताप ( सहसंचालक, पनवेल) यांच्या निर्देशानुसार  दि.25 ऑक्टोबर 2021 ते  2 नोव्हेंबर 2021 हा कालावधी महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ अभियान म्हणून राबविण्यात येत आहे, त्यानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.पाटील यांनी नियोजन करून सर्व विद्यार्थ्यांची लसीकरणाबाबतची माहिती गुगल फॉर्मव्दारे संकलित केली, प्राध्यापकांची समिती स्थापन करून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले , याकामी प्राथमिक आरोग्य केंद्र शिवळेचे विशेष सहकार्य लाभले, 

लसीकरण शिबिराचे उदघाटन सकाळी 10 वाजता संपन्न झाले , यावेळी  प्राथमिक आरोग्य केंद्र शिवळेच्या प्रमुख डॉ. भारती बोटे यांनी 'लसीकरणाबाबतची वस्तुनिष्ठ माहिती देऊन विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले' महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.पाटील यांनी 'दीपावली नंतर महाविद्यालयात 100% विद्यार्थी उपस्थितीत सुरू होणार असल्याने लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले'  उपप्रचार्या डॉ. जी.आर.विशे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले, दिवसभरात 100 हुन अधिक विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी ,प्राथमिक आरोग्य केंद्र शिवळेचे सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे हे शिबीर उत्साहात संपन्न झाले

No comments