web-ads-yml-728x90

Breaking News

सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटनस्थळ विकासासाठी अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पर्यटनस्थळ विकासासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी नगराध्यक्ष ॲड. नजीर काझी यांच्यासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

No comments