web-ads-yml-728x90

Breaking News

सर्वधर्मियांनी शासकीय योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाव्यात – राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन व बुद्धीने एकत्र येणे आवश्यक असून अल्पसंख्याक सर्वधर्मिय नेत्यांनी, धर्मगुरूंनी केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांचा समान न्याय, शिक्षण व रोजगाराचा पाया मजबूत करावा, असे आवाहन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी केले.सह्याद्री अतिथीगृह येथे विविध धर्मियांच्या प्रतिनिधिंसोबत आयोजित बैठकीत श्री. लालपुरा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर, अल्पसंख्याक विकास विभागाचे सहसचिव एस.सी.तडवी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव एस.वाय. बर्वे उपस्थित होते.

No comments